Skip to main content

कधीचं न सुटणारं कोडं होतं......

मी ही कुणावर मनापासून
जिवापाड प्रेम केलं होतं,
तिला ह्रदय काय पैसा काय
अडका काय जिवनचं माझं दिलं
होतं..
रात्र रात्र जागायचो...
तिच्यासाठी मर मर मरायचो,

तिनेही...'मी तुझ्यावर खुप प्रेम
करते रे' असं फसवं उत्तर दिलं होतं..
मी नेहमी खुप खुश असायचो तिला पाहून,
असं काही मनं माझं तिच्यावर जडलं होतं..
ती आली आयुष्यात जेव्हा माझ्या,
तेव्हा तिच्यासोबत सुखी संसार
थाटायचा असं मनोमनी ठरवलं होतं..
ती ही खुप प्रेम करायची माझ्यावर,
तिनेही माझ्यासोबतचं जगण्या मरण्याचं...
खोटं वचन दिलं होतं..
ती सोडून गेली जेव्हा मला बरबाद करुन,
तेव्हा मी तिच्यासाठी
हसर्या डोळ्यांना ढसाढसा रडवलं होतं..
खुप प्रयत्न केले खुप यातना केल्या..
मी तिला समजावण्यासाठी,
तेव्हा असे वाटले जसे
मी मरणाला एक क्षणासाठी थांबवलं होतं..
मी तिला गमावलं..,ती माझ्या नशिबात
नाही म्हणुन,
पण ?????
तीने आयुष्यात ते गमावलं जे फक्त
आणि फक्त तिच्यासाठीचं देवाने बनवलं होतं..
खरचं अजुनही ती सोडून गेली....
ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही माझा,
कारण ?????
खरचं तिने प्रेम केलं होतं..का माझ्यावर कि...
देवाने टाकलेलं माझ्यासाठी कधीचं न सुटणारं
कोडं होतं......#AnonymousGlm

#SandeepGlm

Comments

Popular posts from this blog

उस इंसान पर भरोसा.....

उस इंसान पर भरोसा करो जो आपके अंदर तीन बाते जान सके, मुस्कुराहट के पीछे दुःख, गुस्से के पीछे प्यार, चुप रहने के पीछे वजह.......#AnonymousGlm

Relationship क्या है...?

रिलेशनशिप मतलब एक GF या BF वाला रिलेशनशिप ही नहीं होता.... एक ऐसा रिलेशनशिप जिसमें दो लोग सिर्फ भावनाओं से  एक-दूसरे से जुड़े रहते हैं..... एक ऐसा रिश्ता जिस पर कोई सामाजिक मोहर या नाम...

आठवणGlm

#आठवणGlm समुद्र किनाऱ्यावर चालताना मऊ वाळूवर पडलेलं प्रत्येक पाऊल आपली छाप सोडून जातं... मग हळूच एक लाट येते... आणि ती छाप अलगद आपल्या सोबत घेऊन जाते... अस्सल जीवनातही असंच होतं... ...